ही गोष्ट 1801 सालची आहे, ज्यामध्ये थॉमस यंग नावाच्या एका विशिष्ट इंग्रजी शास्त्रज्ञाने नुकताच एक प्रयोग केला, जो आपल्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दलची आपली समज पूर्णपणे बदलतो. त्याचे नाव आहे, डबल स्लिट प्रयोग. तो या प्रयोगातून हे दाखवून देतो की प्रकाश कण आणि तरंग या दोन्हीची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. पण गंमत म्हणजे..."कोण कसे निरीक्षण करत आहे" हे त्याच्या बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून ठरवले जाते असे या स्वरूपात दिसून येते.
तुम्ही म्हणत असाल की आज मी तुमचा भौतिकशास्त्राचा तास का बरं घेत आहे? मी तुमचा भौतिकशास्त्राचा तास घेत नाहीये पण या संशोधनाच्या निमित्तानं तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे... आणि ती म्हणजे -
'आपलं जीवन बर्याच प्रमाणात आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं'. हेच तत्व आपल्या जीवनाशी किती मिळत–जुळतं आहे, याचा कधी विचार केलं आहे का?
जीवनाच्या दृष्टिकोनाचं शास्त्र
शास्त्र सांगतं की, आपलं वास्तव हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. जसं प्रकाश निरीक्षणावरून आपलं स्वरूप बदलतो, तसं आपणही आपल्या विचारांनुसार आपलं आयुष्य घडवतो.
आज शास्त्रज्ञांनी हे सिध्द केलं आहे की जगातले नव्वद टक्के आजार हे मानसिक (psychological) असतात.
मन आणि शरीर यांचं नातं इतकं जवळचं आहे की तुमची मानसिक अवस्था तुमच्या शारीरिक अवस्थेवर थेट परिणाम करते.
'Epigenetics' आणि आपला दृष्टिकोन
'Epigenetics' हे एक आधुनिक संशोधनाचं क्षेत्र आहे जे सांगतं की:
> "आपल्या आजूबाजूचं वातावरण आणि आपला दृष्टिकोन आपल्या DNA च्या अभिव्यक्तीलाही प्रभावित करतो."
म्हणजेच, आपली विचारपद्धती केवळ मनापुरती मर्यादित नाही, ती आपल्याला शारीरिक पातळीवर सुद्धा बदलू शकते.
मग आपण काय निवडणार?
कणा प्रमाणे जगायचं – मर्यादित, बंदिस्त, फक्त स्वतःपुरतं?
की तरंग प्रमाणे – विस्तारित, खुले, इतरांनाही स्पर्श करणारं?
"One cannot become rich by feeling poor."
"One cannot become happy by feeling sad."
तुम्ही म्हणाल की आम्ही असे अनेक लोक बघीतले आहेत जे कद्रू आहेत पण खूप श्रीमंत आहेत... हे मग कसं काय?
असे लोक पैसे मिळवतात पण पैसे उपभोगू शकत नसतात. काय उपयोग अशा संपत्तीचा जिचा स्वतःला ही उपभोग नाही आणि समाजालाही उपयोग नाही?
हे लोक श्रीमंत असू शकतात पण समृद्ध असू शकत नाहीत. आणि नुसता पैसा मिळवणं हे जीवनाचं अंतिम उद्दिष्ट असू शकत नाही.
स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय आयुष्य बदलणार नाही.
आयुष्य कसं जगायचं स्वकेंद्रित की स्व-विस्मरणीय?
स्वतःचा विचार करणं हे चूक नाही. पण केवळ स्वतःपुरताच विचार करणं म्हणजे कणासारखं जीवन. हे जीवन मर्यादित आहे – ना त्यात समाधान, ना त्यात प्रगती.
पण जेव्हा आपण स्वतःच्या सीमांपलीकडे जातो, इतरांना मदतीचा हात देतो, समजून घेतो, त्यांच्यासाठी काहीतरी करतो... तेव्हा आपण लाट होतो – अमर्याद, मुक्त आणि खऱ्या अर्थानं समृद्ध.
निष्कर्ष: तुम्हाला काय व्हायचं आहे?
कण (Particle) – स्वतःपुरतं जगणारा, कणा सारखा मर्यादित?
की तरंग (Wave) – इतरांनाही जोडणारा, लाटेसारखा व्यापक?
जीवन हे तुमच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे. तुमचं अस्तित्व इतरांच्या आयुष्यातही प्रकाश देऊ शकते!
असं म्हणतात की:
"श्रेष्ठ योगी तो – जो इतरांना उपयोगी."
तेव्हा मंडळी, स्वतःचा विचार करणं हे स्वाभाविक आहे आणि तो आपण केलाच पाहिजे पण नुसता स्वतःचाच विचार न करता जे दुर्भागी आहेत, खऱ्या अर्थाने कमनशिबी आहेत, दुःखी: कष्टी आहेत त्यांचाही विचार करून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होवून ती तडीस नेण्यासाठी जर आपण कटिबद्ध राहिलो तर आपल्या अस्तित्वाचा परीघ कणा प्रमाणे आकुंचित न राहता लाटेप्रमाणे विशाल आणि अमर्याद होवुन जाईल.
