भारताने इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली. ज्यामध्ये १८ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये अनुभवी खेळाडू म्हणून ओळख असलेले अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद शमी यांना स्थान देण्यात आलेले नाही. आता असा प्रश्न निर्माण होतो की, या तिघांची कसोटी कारकिर्द संपुष्टात आली आहे का?
बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी १८ खेळाडूंची निवड करून कसोटी संघाची घोषणा केली आहे, परंतु सर्वात मोठा धक्का त्या चाहत्यांना बसला आहे जे मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना पुन्हा एकदा मैदानावर पाहण्याची आशा करत होते. खरंतर, या तीन अनुभवी खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. या तीन खेळाडूंची कसोटी कारकिर्द संपुष्टात आली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या जागी तरुण खेळाडूंवर बीसीसीआयने विश्वास व्यक्त केला आहे. खरंतर, पुजारा आणि रहाणे संघात परतण्यासाठी बऱ्याच काळापासून वाट पाहत होते.
खरं तर, इंग्लंड दौऱ्यासाठी निवड केलेल्या भारतीय संघात मोहम्मद शमी, पुजारा किंवा रहाणे यांचे नाव हवे होते पण निवड चयनकर्तानी असे केले नाही. त्यावर बोलताना बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले की, शमी अद्याप रेड बॉल क्रिकेटसाठी तंदुरुस्त नाही. वैद्यकीय पथकाच्या मते, शमीचे शरीर सध्या या फॉरमॅटचा वर्कलोड हाताळण्यास सक्षम नाही.
हे दोन खेळाडू भारतीय संघात पुनरागमनाची वाट पाहत आहेत:
या दोन खेळाडू बद्दल बालायचे झाले तर पुजारा आणि रहाणे बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहेत. पुजाराने त्याचा शेवटचा कसोटी सामना जून २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा होता, तो ओव्हल येथे झाला होता. तर रहाणेने भारताकडून शेवटचा कसोटी सामना २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती, तरीही त्याला काही काळानंतर भारतीय संघातून बाहेर करण्यात आले. या दोघांचे वाढते वय पाहता त्यांना परत भारतीय संघात स्थान मिळेल असे वाटत नाही. बीसीसीआयचा हा निर्णय पाहून आता संघ भविष्यासाठी तयारी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरुण खेळाडूंना जागा मिळत आहे आणि जुन्या स्टार खेळाडूंसाठी पुनरागमनाचा मार्ग कठीण होत चालला आहे. अलिकडेच अजिंक्य रहाणेने त्याच्या पुनरागमनाबाबत मोठे विधान केले होते. खरं तर, त्याने म्हटले होते की त्याला अजूनही आशा आहे की तो भारतीय संघात परतेल, पण इंग्लंड दौऱ्यावर असे घडले नाही.
अजिंक्य रहाणेची कसोटी कारकीर्द:
अजिंक्य रहाणे याने कसोटी क्रिकेटमध्ये ८२ सामन्यांमध्ये ४९३१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १२ शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या १८८ आहे. २०२१ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना भारताला ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकून दिली होती.
चेतेश्वर पुजाराची कसोटी कारकीर्द:
चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये १०३ सामन्यात ७१९५ धावा केल्या असून, ज्यामध्ये १९ शतके आणि ३५ अर्धशतके यांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या २०६ आहे. त्यामध्ये ३ द्विशतकांचाही समावेश आहे. पुजाराला इंग्लंडमध्ये खेळायला खूप आवडते. त्याने इंग्लंडमध्ये १६ सामन्यांमध्ये २९ च्या सरासरीने ८७० धावा केल्या आहेत.
शुभमन गिल कसोटी संघाचा नवा कर्णधार:
शुभमन गिलची भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड झाली आहे. त्याच्यासोबत ऋषभ पंतला उपकर्णधार करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, जर आपण संघात समाविष्ट केलेल्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, केएल राहुल, अभिमन्यू ईश्वरन यासारख्या तरुण फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव सारखे खेळाडू आहेत. खरंतर, संघाच्या या नवीन संयोजनावरून हे स्पष्टपणे दिसून येते की निवडकर्ते आता तरुणांना तयार करण्याच्या दिशेने काम करत आहेत.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ:
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.
