बारावीचा निकाल लागून काही दिवस उलटले असतानाच आता सगळ्यांच्या नजरा दहावीच्या निकाल कधी लागणार याकडे आहेत. दहावीच्या निकालाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. एकीकडे सगळ्या बोर्डाचे निकाल जाहीर झाले आहेत. या सगळ्या शालेय निकाला पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा २०२५ चा निकालाची अपडेट समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा निकाल उद्या म्हणजेच १३ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर उपलब्ध करून दिला जाणार असून, सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी महत्त्वाच्या वेबसाईट्स:
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना खालील वेबसाईट्सवर निकाल पाहता येणार आहे:
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
results.targetpublications.org
निकाल पाहताना काय लागणार?
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकावे लागेल. त्यामुळे निकाल पाहण्याआधी ही माहिती तयार ठेवा. निकालात विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण, एकूण टक्केवारी, जन्मतारीख आणि रोल नंबर आदी माहिती असणार आहे.
या वर्षीचा परीक्षेचा आढावा
यंदाच्या २०२५ मधील दहावीच्या परीक्षेला 16 लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत पार पडली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थी निकालासाठी उत्सुक आहेत.
निकालापूर्वी पत्रकार परिषद
मंडळातर्फे निकाल लागण्याआधी काही तास आधी एक पत्रकार परिषद आयोजित केली जाईल. या पत्रकार परिषदेत संपूर्ण राज्यातील निकालाची टक्केवारी, यशस्वी विद्यार्थी, टॉपर लिस्ट, मुला-मुलींचे यश इत्यादीची आकडेवारी सादर केली जाईल. ही आकडेवारी शैक्षणिक वर्षाचा समारोप करणारी ठरेल.
निकाल पाहताना लक्षात ठेवाव्या काही टिप्स:
* अधिकृत वेबसाईटवरूनच निकाल तपासा.
* इंटरनेट कनेक्शन स्थिर असावे.
* निकाल पाहिल्यावर त्याचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआउट घ्या.
* मूळ मार्कशीट नंतर शाळेमार्फत वितरित केली जाईल.
निकाल म्हणजे शेवट नव्हे, सुरुवात आहे!
निकाल कोणताही असो, तो तुमच्या मेहनतीचं प्रतिबिंब आहे. यश आणि अपयश या दोघांचा स्वीकार करत पुढील शिक्षणाची दिशा ठरवा. तुमचं स्वप्न मोठं आहे आणि ही परीक्षा त्याकडे नेणारी एक पायरी आहे. आत्मविश्वास ठेवा आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील राहा. यश तुम्हाला निश्चितच मिळेल.
